नवी दिल्ली : गणेशोत्सवात लाऊडस्पिकरना हायकोर्टानं लादलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीये. त्यामुळे राज्यात उद्याच्या गणेश विसर्जनाला डाऊडस्पीकर आणि डॉल्बीचा दणदणाट होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवात सायलेन्स झोन ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. केंद्र सरकारनं ध्वनी प्रदुषणाबाबत नोटीफिकेशन  काढलं होतं. या नोटीफिकेशनला हायकोर्टानं स्थगिती दिली होती. 


ही स्थगिती आज सु्प्रीम कोर्टानं उठवलीये. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी थेट २२ तारखेला होणार असल्यामुळे उद्याच्या विसर्जनावेळी सर्वांनाच लाऊडस्पीकर वापरता येणार असल्याचं स्पष्ट झालंय.