आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे? सुप्रीम कोर्टात आज फैसला
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्ड साठी आधार सक्तीचे असावे का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. इन्कम टॅक्स १३९ A A हा कायदा २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आला.
नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्ड साठी आधार सक्तीचे असावे का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. इन्कम टॅक्स १३९ A A हा कायदा २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आला.
या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणे सक्तीचे असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. बनावट कागदपत्रे देऊन पॅनकार्ड तयार केल्या जातात. त्यावरून बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार केले जात आहेत.
याला आळा घालण्यासाठी आधार सक्तीचे असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. परंतू यापूर्वी आधार ऐच्छिक असल्याचे सरकारचे मत होते. सरकारच्याच दोन वेगवेगळ्या मतप्रवाहामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
सध्या केंद्र सरकारच्या १९ मंत्रालयाअंतर्गत ९२ योजना आधारशी जोडल्या आहेत. परंतु इन्कम टॅक्स रिटर्न आणि पॅन कार्डसाठी आधार कार्ड देणे गरजेचे आहे का, यावरचा फैसला सुप्रीम कोर्ट आज ठरवणार आहे.