नवी दिल्ली: काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतील कलम ३५ (अ) रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील आज होणारी सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. ३ न्यायमूर्तींचं खंडपीठ याचिकेवर सुनावणी करू शकत नाही, असं मुख्य न्यायायमूर्तींनी आजच्या सुनावणीत म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.  तर फुटीरतावाद्यांनी काश्मीर बंदचं आवाहन केलंय. 'अनुच्छेद ३५-ए'ला समर्थन देण्यासाठी फुटीरतावाद्यांनी या बंदची हाक दिलीय.  या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा २ दिवसांसाठी रद्द करण्यात आलीय.