नवी दिल्ली: एका प्रवाशानं इंडिगोच्या विमानात डास चावत असल्याची तक्रार केल्यानं त्याला थेट विमानतून बाहेर हकालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. लखनऊ विमानतळावर हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी चौफेर टीका सुरू झाल्यावर केंद्रीय वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, डॉ. सौरभ राय लखनऊहून बंगळुरूला जात होते. त्यावेळी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात डास असल्याची तक्रार त्यांनी केली. डॉ. राय यांनी डासांचा व्हिडीओही काढला. डासांबद्दल जेव्हा त्यांनी कॅबिन क्रूकडे तक्रार केली, त्यावेळी त्यांना जबरदस्तीनं विमानातून उतरवण्यात आलं, असा आरोप डॉक्टर राय यांनी केलाय.... तर डॉ. सौरभ राय हेच धमक्या देत होते, असं इंडिगो एअरलाईन्सचं म्हणणं आहे. याप्रकरणी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.