नवी दिल्ली : राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सल्ल्यानंतर कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची देखील जबाबदारी सोपवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्रिमंडळातून तेलुगू देशम पक्षाचे अशोक गजपती राजू यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या मंत्रालयाचा अधिक भार हा सुरेश प्रभू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिऴावा या मागणीसाठी टीडीपीने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एनडीएमधून टीडीपी बाहेर पडल्याने टीडीपीच्या 2 मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर राष्ट्रपतींनी तो मंजूर केला आहे.