नवी दिल्ली : लेफ्ट. जनरल  राजेंद्र निंभोरकर यांचा राष्ट्रपती पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. राजेंद्र निंभोरकरांना यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आलं आहे.


राजेंद्र रामराव निंभोरकर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्जिकल स्ट्राईकमध्ये राजेंद्र रामराव निंभोरकर यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे.


निंभोरकर हे मूळचे धुळे जिल्ह्यातील


लेफ्ट. जनरल  राजेंद्र निंभोरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं, सर्जिकल स्ट्राईकची संपूर्ण व्यूहरचना राजेंद्र निंभोरकर यांनी ठरवली होती, निंभोरकर हे मूळचे धुळे जिल्ह्यातील आहेत.


तीनही भाऊ लष्कराच्या सेवेत


भारतीय लष्कराने सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यासाठी, पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन, दहशतवाद्याचा फडशा पाडला होता, हे सर्जिकल स्ट्राईक निंभोरकर यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. राजेंद्र निंभोरकरांसह त्यांचे दोन भाऊ देखील लष्करी सेवेत आहेत.