चेन्नई : भारतीय प्रादेशिक राजकारणात प्रत्येक राज्याचे स्वत:चे म्हणून असे खास वैशिष्ट्य आहे. जसे की तामिळनाडू. या राज्यात राजकिय पक्षाचा प्रमुख हा कला, साहित्य, खेळ अशा क्षेत्रातीलच पाहिजे असा अलिखीत नियम. या नियमाला अनूसरून तमिळी सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरला. आता चर्चा आहे, त्याच्या राजकीय पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूमध्ये २०२१मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. वाढत्या वयामुळे प्रचंड मर्यादा आलेले करुणानिधी आणि जयललीता यांचा अकाली मृत्यू. यामुळे तमिळी राजकारणात प्रचंड पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्याचा रजनीकांतचा विचार आहे. या पार्श्वभूमिवर इंडिया टुडे आणि कार्वीने एक जनमत चाचणी घेतली. या चाचणीत रजनीकांतच्या पक्षाला अवघ्या ३३ जागा मिळण्याचे प्राथमिक भाकीत वर्तवण्यात आले आहे. तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी निवडणुक होणार आहेत.


या जनमत चाचणीत डीएमकेला फायदा होताना दिसत आहे. जयललीता यांची जादू चालल्याने २०११मध्ये तामिळनाडूत एआयडीएमकेची सत्ता आली. त्यामुळे करूणानिधी यांचा डीएमके सत्तेबाहेर फेकला गेला. सध्या जनमत चाचणीत डीएमकेला १३० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या निवडणुकीत डीएमकेला ३४ टक्के पॉप्यूलर मते मिळतील. जी रजनीकांतच्या पक्षापेक्षा दुप्पट आहेत.


२०१६च्या निवडणुकीत डीएमकेला ९८ जागा मिळाल्या होत्या. जनमत चाचणीतील अकडेवारीनुसार २०२१च्या निवडणुकीत सर्वाधीक नुकसान एआयडीएमकेला होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. २०१६च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२१ मध्ये एआयडीएमकेला ६७ जागांची हानी पोहोचू शकते.


तामिळनाडू जनतेची मुख्यमंत्री पसंती...


विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून तामिळी जनतेने रजनिकांतला द्वितीय पसंती दिली आहे. तर डीएमकेचे स्टॅलीन यांना प्रथम पसंती दिली आहे. विद्यमान मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना केवळ ११ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अनुक्रमे रजनिकांत आणि स्टॅलीन यांना १७ आणि ५० टक्के लोकांनी पसंती दिली आहे.