मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांवर आणखी एक आघात झाला आहे. एकाचवेळी कुटुंबातील पाच व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी सिकंदरा - शेखपुरा एनएच-333 वर हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील पिपरा गावाजवळ अपघात झाला. हा अपघात ट्रक आणि सूमोत झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावरच पाच जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचे पती लालजीत सिंह यांचा देखील मृत्यू झाला आहे. ते हरियाणामध्ये एडीजी पदावर होते. यांच्यासोबत दोन बहिणी आणि इतर दोन नातेवाईकांचा समावेश आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजीत सिंह आपली पत्नी गीता देवी यांच्यावर अंत्यसंस्कार करून परतत होते. या सूमोत 10 जणांचा समावेश होता. 


मृतांमध्ये सुशांतच्या या नातेवाईकांचा समावेश 


लालजीत सिंह (बहिणीचे पती)
अमित शेखर उर्फ नेमानी सिंह
रामचंद्र सिंह
बेबी देवी
अनिता देवी
प्रीतम कुमार (चालक)


सहा जणांव्यतिरिक्त चार जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना सिकंदरा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून दोन जणांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना पीएमसीएच (पाटणा) येथे रेफर करण्यात आले आहे.


पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला. लखीसरायचे एसपी सुशील कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची माहिती घेतली. तपासाअंती सुमोमध्ये १० जण असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला फक्त सहा लोकांबद्दल बोलले जात होते