नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी तपासाचा गुंता कमी होण्याऐवजी अधिकच वाढत असल्याचं चित्र आहे. रोज काही ना काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी Subramanian Swamy यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या झाली असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुब्रमण्यम स्वामी यांनी एक केलेल्या एका ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सुशांतची हत्या झाली असावी, असं ट्विट करत त्यांनी, ट्विटमध्ये एक कागदपत्रही शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी सुशांतची हत्या झाली असल्याच्या दिशेने काही मुद्दे ठळकपणे मांडले आहेत. सुशांतच्या गळ्यावरील खूणा, आत्महत्या केल्याचं दर्शवत नसल्याचं, ते म्हणाले आहेत.


सुब्रमण्यम स्वामी यांनी जे कागदपत्र शेअर केलं आहे, त्यात सुशांतच्या आत्महत्येसंबंधी संबंधीत जवळपास 26 मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ 2 मुद्दे आत्महत्येच्या थेअरीला सपोर्ट करत असून 24 मुद्द्यांचा इशारा हत्येकडे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 



याआधी बुधवारीदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन, सुशांतला न्याय मिळावा आणि दोषींविरोधात कठोर कारवाई व्हावी, असं म्हटलं होतं.