सुशांतच्या बहिणीने व्हिडिओ शेअर करत केली सीबीआय चौकशीची मागणी
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला 2 महिने होत आले आहेत पण कारण मात्र अजूनही अस्पष्ट
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला 2 महिने होत आले आहे. परंतु अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. या प्रकरणाच्या चौकशीवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत सुशांतला न्याय देण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. आता सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्तीने देखील आपल्या भावाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
श्वेताने म्हटले की, मी सुशांतसिंह राजपूतची बहीण आहे. मी सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आवाहन करते.' कॅप्शनमध्ये तिने म्हटलं की, सत्य शोधण्याची वेळ आली आहे जेणेकरुन आम्हाला न्याय मिळेल. कृपया आमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण जगाला सत्य काय आहे हे जाणून घेण्यास मदत करा. जेणेकरून एखाद्या निष्कर्षावर पोहोचता येईल. अन्यथा आम्ही कधीही शांततापूर्ण जीवन जगू शकणार नाही. सुशांत प्रकरणाची सीबीआयकडून चौकशीसाठी आवाज उठवा.'
सुशांतची बहीण श्वेताने सीबीआय चौकशीची मागणी करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणाली की, तिला या प्रकरणात निष्पक्ष चौकशी हवी आहे जेणेकरून सत्य समोर येईल.' सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालय आज आपला निर्णय देईल. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करणार की सीबीआय हे स्पष्ट होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बुधवारी सुशांतच्या डायरीची काही पाने त्याच्या कुटुंबियांनी जाहीर केली. ज्यामध्ये सुशांतच्या 2020 च्या योजनांविषयी खुलासा केला गेला. सुशांतच्या डायरीबाबत बहीण श्वेताने म्हटले की, 'कोणी असा व्यक्ती ज्याची छान योजना तयार आहे. त्याला माहित आहे की, त्याला त्याची स्वप्न सत्यात कशी उतरवायची आहेत. जो सकारात्मकतेने भरला आहे. माझा भाऊ मी तुला सल्यूट करते.'