जयपूर : राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पायलट गटाने हे स्पष्ट केले आहे की त्यांची काँग्रेस हायकमांडशी कोणतीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस हायकमांडच्या वतीने पायलट गटातील आमदारांशी कुणी संपर्क केलेला नाही. त्याचबरोबर पायलट गटाचे हे आमदार १४ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात भाग घेतील की नाही याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार वेद सोलंकी म्हणाले की, १४ ऑगस्ट रोजी आम्ही विधानसभेत येऊ अशी चर्चा आहे, हे खरे नाही. आमचे नेते सचिन पायलट यांनी अद्याप १४ ऑगस्ट रोजी विधानसभेत जायचे की नाही याचा निर्णय घेतलेला नाही.


वेद सोलंकी म्हणाले की, 'आम्ही सचिन पायलट यांच्या बरोबर आहोत. ते जे काही बोलतील, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ. आम्ही भाजपच्या पाहुणचारात असल्याचा आरोप केला जात आहे, हे खोटे आहे, कारण जेव्हा आम्ही जयपूर सोडले, तेव्हा आम्ही ठरवले होते की आम्ही आमचा खर्च स्वतः उचलणार आहोत. आत्तापर्यंत आम्ही हॉटेलचे बिल स्वत: दिले आहे आणि पुढेही देऊ. आम्ही वकिलांची फीसुद्धा स्वतः देऊ.'


दुसरीकडे, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपनेही आपल्या आमदारांना वाचवण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सचा अवलंब केला आहे. राजस्थानातील भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेनमधून गुजरातमधील पोरबंदर येथे पोहोचले आहेत. पोरबंदरमधील भाजपचे आमदार सोमनाथ मार्गे रवाना होतील. वास्तविक, भाजपला भीती आहे की काँग्रेस त्यांचे आमदार फोडू शकते. अशा परिस्थितीत भाजप आता आमदारांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.