मुंबई : जगभरात ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वापर केला जातो. या डिक्शनरीमध्ये नुकताच 1000 हून अधिक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा हिंदी भाषेतील काही इंटरेस्टिंग शब्दांचा वापर करण्यात आला आहे. 


हिंदी शब्दांचा वापर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा 'टायगर जिंदा है' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. याचित्रपटातील 'स्वॅग से स्वागत...' हे गाणं आबालवृद्धांच्या ओठांवर बसले आहे. आता स्वॅग हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही पोहचला आहे. यासोबतच भारतातील काही लोकप्रिय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. हिंदीतील चर्चित शब्दांमध्ये 'आधार' या शब्दाची निवड करण्यात आली आहे.  


चार वर्षातून निवड  


ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी वर्षातून चार वेळेस नव्या शब्दांना अपडेट करते. जो शब्द लोकं बोलण्या चालण्यात अधिक वापरतात त्यांचा समावेश करण्यात येतो. ऑक्सफर्ड डिक्शनरीने इंग्रजी शब्दांप्रमाणेच यंदा पहिल्यांदा वर्षातील हिंदी शब्दाची घोषणा केली जाते. जयपूर लिटरेचर फेस्टमध्ये 'आधार' या शब्दाची निवड 2017 चा हिंदी शब्द म्हणून गौरव करण्यात आला आहे. 


या शब्दांचादेखील झाला समावेश 


Lactivism: स्तनपान करण्याच्या क्रियेसाठी या शब्दांचा वापर केला जातो. यामध्ये lactation' (दूध पाजणं) आणि 'activism'या शब्दाचा समावेश आहे. 


Hangry:हा शब्द हंग्री आणि अ‍ॅन्ग्री या शब्दाचा कॉम्बो आहे. भूकेमुळे राग अनावर  होणं असा त्याचा अर्थ आहे. 


Masstige:महागड्या वस्तू स्वस्तामध्ये विकल्या जातात त्याला Masstige म्हणतात


Ransomware : हा टेकसेवींचा शब्द आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे मात्र त्याचा वापर वाईट गोष्टींसाठी केला जातो.  


Snowflake: आवश्यकतेपेक्षा अधिक नाजूक आणि संवेदनशील असणार्‍यांना Snowflake  म्हणतात. 


Tom Girl: मुलांप्रमाणे रावडी अंदाजातील मुलींना टॉम गर्ल म्हणतात. 



मागील वर्षी तेलगू भाषेतील अण्णा आणि हिंदीतील चना दाल या शब्दांचाही ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला होता.