Swami Rambhadracharya Abhinav Arora Viral Video: सोशल मीडियात बाल संत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनव अरोरा सध्या खूप चर्चेत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमामुळे तो पुन्हा चर्चेत आलाय. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनवने टाळी वाजवून राम नावाचा जयजयकार केला. तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी त्याला मध्येच टोकले. यानंतर त्याला मंचावरु खाली उतरवण्यात आले.  स्वामी रामभद्राचार्य यांच्या आवाहनानंतर अभिनव याला तात्काळ मंचावरुन खाली उतरवण्यात आले. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या सर्व प्रकारानंतर रामभद्राचार्य यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वामी रामभद्राचार्य यांनी एएनआयला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जी प्रतिक्रिया सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. खूप मुर्ख आहे तो मुलगा. कृष्ण माझ्यासोबत शिकतात, असे ते म्हणतो. कृष्ण माझ्यासोबत शिकणार आहेत. मी वृंदावनमध्ये त्यांना ओरडलो देखील होतो', असेही तो सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. 



काय आहे संपूर्ण प्रकरण? 


नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये अभिनव अरोरा याने जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्या सभेला उपस्थिती लावली होती. कोणतरी इसम रामभद्राचार्य यांना काहीतरी सांगताना एका व्हिडीओत दिसतंय. यावेळी अभिनव अरोरा जाऊन स्वामी रामभद्राचार्य यांना जाऊन भेटतो. यानंतर जयजयकार करु लागला.



अभिनव याचे हे वागणे स्वामी रामभद्राचार्य यांना आवडले नाही. त्याला खाली उतरवा. माझ्यादेखील काही मर्यादा आहेत. असे स्वामी भद्राचार्य यावेळी म्हणाले. रामभद्राचार्य यांनी अभिनव अरोराला स्टेजखाली उतरवण्याचा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडयात खूप व्हायरल झाला. 


10 वर्षाच्या अभिनव अरोराचे व्हिडीओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत असतात. कोणी त्याला फ्रॉड म्हणतं तर कोणी आई-वडिलांचा खोटा बाबा असेदेखील म्हणतात. तर काहीजण खरंच या मुलाला संत मानतात. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहे. पण सोशल मीडियात एका मोठा वर्ग आहे, जो अभिनव अरोराला खूप ट्रोल करत असतो.