मुंबई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील सर्व राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद आहेत. अशा परिस्थितीत स्विगीच्या माध्यमातून जेवणाची आणि खाद्य पदार्थींची होम डिलिव्हरी केली जात आहे. या कठीण काळातही या ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्मचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत आणि लोकांच्या घरी जाऊन त्यांना सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या कंपनीने त्यांना दिलासा दिला आहे. आता कर्मचारी आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करतील. अशाप्रकारे, मे महिन्यात कर्मचार्‍यांसाठी फक्त चार दिवसांचे वर्क वीक असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना युगात, स्विगी कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी त्यांना एडव्हान्स पगाराची रक्कम, लीव एनकॅशमेंट आणि लोनची सुविधा देत आहे. या व्यतिरिक्त, कोणताही कर्मचारी कोरोनामुळे ग्रस्त असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबियांना या साथीच्या आजाराची लागण झाल्यास उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलेल. ग्रेड 1 ते 6 च्या कर्मचार्‍यांना मे महिन्याच्या अखेर पर्यंत लवकर पगार देण्याचेही कंपनीने ठरवले आहे. कंपनीचे एचआर हेड गिरीश मेनन (Girish menon) यांनीही कर्मचार्‍यांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याबद्दल ईमेल पाठवला आहे.


ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, "तुम्ही आठवड्यातून असे दिवस ठरवा जेव्हा तुम्हाला काम करायचे आहे आणि बाकीच्या दिवशी आराम करा आणि कुटुंबाची काळजी घ्या."


स्विगी कर्मचार्‍यांसाठी हेल्पलाईन सुरू


जर स्विगी कर्मचा-याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले तर, त्याला तातडीने कंपनीकडून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येईल. हॉस्पिटलमध्ये बेड घेण्यास, आयसीयू, प्लाझ्मा, ऑक्सिजन सिलिंडर इत्यादी मिळविण्यासाठी कंपनी त्याला मदत करेल. एवढेच नाही तर, कर्मचार्‍यांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय सहाय्यही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी सहाय्यक हेल्पलाईन देखील सुरू केली आहे. तसेच यासाठी अॅपही तयार करण्यात आला आहे.


निधीतून 80 कोटी मिळवले


स्विगीने नुकतेच 80 करोड डॉलर्स निधीतून जमा केले होते. त्यामार्फत ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सुमारे दोन लाख डिलीवरी पार्टनर्ससाठी कोरोना लसीची व्यवस्था केली आहे.