Swiggy कडून अनलिमिटेड फ्री डिलीव्हरीची घोषणा, फक्त तुम्हाला कराव लागेल `हे` काम
Swiggy वरून ऑनलाईन पदार्थ मागवत आहात, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण ऑनलाईन पदार्थ ऑर्डर करतात. या सोयीमुळे घरबसल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो. तुम्ही देखील अनेकदा Swiggy वरून खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 'ऑनलाइन' फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरीची सुविधा देणाऱ्या स्विगी प्लॅटफॉर्मने मेंबरशिप प्रोग्राम संबंधित ग्राहकांसाठी अधिक सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे ही बातमी स्विगीवरून पदार्थ ऑर्डर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
स्विगीकडून सांगण्यात आलं आहे की, 'या प्रोग्रामासोबत संबंधित सदस्यांना 10 किमीच्या परिसरातील सर्व रेस्टॉरंटमधून किमान 149 रुपयांच्या ऑर्डरची अनलिमिटेड डिलिव्हरी मोफत मिळेल.' म्हणून तुम्ही देखील स्विगीवरून पदार्थ मागवत असाल, तर तुम्हाला फायदा होणारचं आहे.
या मेंबरशिप प्रोग्राममध्ये रोज वापरात येणारे प्रोडक्टसोहतचं फळ, भाज्या, लहान मुलांच्या वस्तू, पर्सनल केअर एवढंच नाही, तर घरी वापरात येणाऱ्या वस्तू देखील तुम्हाला ऑर्डर करता येणार आहे.
स्विगीनुसार या प्रोग्रामसोबत जोडण्यासाठी ग्राहकांना 12 महिन्यांसाठी 899 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 299 रुपये मोजावे लागणार आहेत. शिवाय कंपनीने 49 रुपयांमध्ये 15 ते 30 दिवसांसाठी 'स्विगी वन ट्रायल' सुद्धा ग्राहकांना वापरचा येणार आहे.
ग्राहकांना या सुविधेचा फायदा घेण्यासाठी 'स्विगी वन मेंबरशिप' (Swiggy One Membership) घ्यावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे स्विरीच्या या निर्णयाने ग्राहकांना नक्कीचं फायदा होईल.