स्विमिंगपूलमध्ये जीवघेणा स्टंट, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
या मुलाचा स्विमिंगपूलमधील स्टंट फसला आणि काय झालं पाहा थरारक व्हिडीओ
नवी दिल्ली: बऱ्याचदा जीवावर स्टंट बेतेल याची कल्पना असतानाही असे प्रकार प्रसिद्धीसाठी किंवा मजेसाठी करण्याचा हट्ट काहीजणांचा असतो. स्टंट फसला तर काय होऊ शकतं याची जाणीवही कदाचित या मुलाला नसावी. या मुलाने केलेल्या स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. बरेचदा प्रसिद्धीसाठी जीवघेणे स्टंट केले जातात.
असे स्टंट तुमच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे असे स्टंट करू नका. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की मुलगा बॅक फ्लिप मारण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर चढतो. मात्र हा स्टंट फसतो आणि त्या व्यक्तीच्या अंगावर हा मुलगा स्विमिंगपूलमध्ये पडतो. या व्यक्तीलाही असं काही घडेल याची पुसटशीही कल्पना नसावी.
एका चुकीमुळे हा स्टंट दोघांच्याही जीवावर बेतल्याचं दिसत आहे. अनेक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका युझरने तर नक्कीच मान मोडली असावी अशी कमेंट केली आहे. 10 सेकंदाचा हा व्हिडीओ शेख नूर नावाच्या युझरने फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तर या व्यक्तीला किती दुखापत झाली याचीही कोणतीही अपडेट अजून हाती आलेली नाही.
झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची चर्चा होत आहे. अशाप्रकारचे स्टंट करू नये असं आवाहन झी 24 तास करत आहे.