नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहाल तुम्हाला माहिती असेलच. बादशहा शाहजानने आपली पत्नी मुमताज हिची स्मृती जपण्यासाठी ताजमहाल बांधला. मात्र, हे ताजमहाल मंदिर नाहीये तर समाधीस्थळ असल्याचं एएसआयने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताजमहाल हे मंदिर नसल्याचा अहवाल भारतीय पुरातत्त्व विभागाने न्यायालयात सादर केला आहे. पुरातत्व खात्याच्या अधिका-यांच्या मते, ताजमहाल संरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने १९२० च्या एका अधिसूचनेच्या आधारावर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.


२०१५ साली आग्रा जिल्हा न्यायालयात सहा वकिलांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटलं होतं की, ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदिर होते आणि त्याला तेजो महालय या नावाने ओळखलं जात होतं. इतकेच नाही तर ताजमहालात काही बंद खोल्या आहेत त्या उघडण्यात याव्या अशीही मागणी करण्यात आली होती. या परिसरात आरती करण्याची परवानगी द्यावी असेही याचिकेत म्हटले आहे.


या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय संस्कृती मंत्रालय, गृह सचिव आणि एएसआय यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. या प्रकरणी गुरुवारी एएसआयने गुरुवारी आपलं स्पष्टीकरणं दिलं आहे.


भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्तर देताना म्हटलं की, ताजमहाल ही वास्तू शहाजानने बांधली असून त्याजागी आधी मंदिर होते किंवा या वास्तूचे नाव तेजोमहाल होते असे कोणतेही पुरावे नाहीयेत.


या प्रकरणाती पूढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.