`गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला`
जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.
जयपूर : जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करून गोहत्या करणाऱ्यांना जन्मठेप होईल, यासाठी पावलं उचलण्याचे आदेश हायकोर्टानं राजस्थान सरकारला दिलेत.
नेपाळ हे हिंदुराष्ट्र आहे आणि तिथं गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केलंय. भारत हा पशुधनावर विसंबून असलेला कृषीप्रधान देश आहे. घटनेतल्या कलमांनुसार गायीच्या संरक्षणाला कायदेशीर चौकट मिळवून देणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं न्यायमूर्ती महेश चंद शर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटलंय. विशेष म्हणजे न्या. शर्मा यांचा सेवेतला आज शेवटचा दिवस होता. राज्य सरकारनं याबाबत केंद्रासोबत संवाद साधावा, असंही त्यांनी म्हटलंय.