मर्दानगी महागात; मित्रांना पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी Vigra चा डोस वाढवला अन् घात झाला..
Viagra Overdose Case: उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
प्रयागराज : Viagra Overdose Case: उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. इथे एका व्यक्तीने लग्नानंतर काही दिवसांनी आपल्या मित्रांच्या सल्ल्यानुसार रोज वियाग्रा घेणे सुरू केले, परंतु कोणास ठाऊक होते की ते त्याच्यासाठी घातक ठरेल. त्याने व्हायग्राचा ओव्हरडोज घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रकरण इतके गंभीर झाले की डॉक्टरांना त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
लग्नानंतर वियाग्राचा घेतला ओव्हरडोज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तरुणाच्या मित्रांनी त्याला सेक्स पॉवर वाढवण्यासाठी व्हायग्रा घेण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांचा सल्ला न घेता, त्याने दररोज 25-30 मिलीग्राम वियाग्रा घेणे सुरू केले, परंतु जेव्हा काही फरक पडला नाही तेव्हा त्याने मित्रांच्या सांगण्यावरून त्याचा डोस वाढवला. तरूणाने 200 मिलीग्रॅम वियाग्रा खाल्ला. या चुकीमुळे व्हायग्राची गोळी त्याच्यासाठी जीवनाचा सापळा बनली.
गोळ्यांच्या प्रभावाने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्रास वाढला आणि 20 दिवस त्याला अस्वस्थता जाणवली. अखेर त्याने हॉस्पिटल गाठले. दरम्यान नववधू देखील रागाच्या भरात तिच्या माहेरच्या घरी गेली. डॉक्टरांनी गांभीर्य लक्षात घेता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
ऑपरेशननंतर परिस्थिती सामान्य झाली असली तरी आता हा त्रास कमी अधिक प्रमाणात आयुष्यभर राहणार असल्याचे सांगण्यात आले. तो मुलांना जन्म देऊ शकतो, मात्र त्रासाला समस्येला सामोरे जावे लागेल, अशी माहितीही देण्यात आली.
युरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. दिलीप चौरसिया यांनी सांगितले की, तरुण आधीच व्हायग्रा घेत होता आणि लग्नानंतर त्याने त्याचा डोस वाढवला, त्यानंतर त्याची शारीरिक संबध ठेवण्याची क्षमता संपली.
या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. डॉक्टर लोकांना सल्ला न घेता व्हायग्रा घेण्यास मनाई करतात. आता रुग्णाची प्रकृती ठीक असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.