तंजावर : Thanjavur Accident: तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी तंजावर जिल्ह्यातील मंदिर उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  मिरवणुकीदरम्यान रथ वरुन जाणाऱ्या उच्च दाबाच्या वायरच्या संपर्कात आला, त्यानंतर संपूर्ण रथावर विद्युत प्रवाह उतरला आणि आग लागली. यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रथयात्रेदरम्यान भाविक रस्त्यावरुन जात असताना वरुन जाणाऱ्या विजेच्या ताराचा रथाच्या संपर्कात आल्याने विद्युत प्रवाह रथात उतरला. या अपघातात अनेक जण जखमी आणि भाजल्याचेही वृत्त आहे. उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे.


तामिळनाडूच्या तंजावर येथे मंदिराच्या रथ मिरवणुकीदरम्यान उच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाइनच्या संपर्कात आल्यानंतर 10 लोकांना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. ताज्या वृत्तानुसार, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिराची रथ मिरवणूक सुरु असताना जवळील कालीमेडू येथे ही घटना घडली.



मंदिराचा रथ एका वळणावर आल्यानंतर ओव्हरहेड लाईनच्या संपर्कात आला. यावेळी विद्युत प्रवाह रथात उतरला आणि अनेकांना शॉक लागला. रथावर उभे असलेले लोक या धडकेत फेकले गेले, असे पीटीआयने सांगितले. त्यानंतर रथाला मोठी आग आगली. जखमी झालेल्या तीन जणांना तंजावर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.