महाराष्ट्रानंतर आता मदुराईमध्ये ४७ मोर मृतावस्थेत
मदुराई : तामिळनाडूच्या मदुराईमध्ये ४७ मोर मृतावस्थेत आढळून आलेत. एकाच वेळी इतक्या संख्येने मोर मृतावस्थेत आढळल्याने गावातील नागरिक हादरलेत. ज्या ठिकाणी हे मोर मृतावस्थेत आढळलेत तिथे शेतजमीन नाही. त्यामुळे या मोरांवर विषप्रयोग झाल्याचे बोललं जातंय. विषारी धान खाल्ल्याने या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. याप्रकरणी वनविभाग अधिक तपास करतंय.