मुंबई : कोरोनाने संपूर्ण देशात थैमान मांडल आहे. घरी राहणं हा एकच पर्याय या कोरोनावर मात करण्यासाठी आहे. सरकारकडून लॉकडाऊन करूनही अनेक नागरिक घराबाहेर पडताना दिसतात. सोशल डिस्टन्शिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. अशावेळी पोलिस कडक कारवाई देखील करतात. पण या कारवाईला नागरिक न जुमानता पुढे जातात. अशावेळी तामिळनाडू पोलिसांनी जी शक्कल लढवली त्याची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूत मास्क न घालणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो रस्त्यावर विनाकारण दोन बाईक वरून पाच मुलं फिरताना दिसत आहेत. एका बाईकवर तीन तर दुसऱ्या दोन मुलं बसली आहे. मुळात यांनी सोशल डिस्टन्शिंगचे आणि मास्क वापरणे असे दोन्ही नियम मोडले आहेत. 



तसेच विनाकारण फिरत असल्याची गोष्ट समोर आली. या मुलांना चांगलीच अद्दल घडवायची म्हणून पोलिसांनी एका ऍम्ब्युलन्समध्ये यांना नेलं. यामध्ये एक रूग्ण झोपला होता. कोरोनाबाधित रूग्णासोबत आपल्याला ऍम्ब्युलन्समध्ये ठेवत असल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली आणि एकच पळापळ पाहायला मिळाली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.