मुंबई : शाळेतील आवडत्या शिक्षकाची गोष्टच वेगळी असते. शाळेत प्रत्येक विद्यार्थाचा 'फेव्हरेट शिक्षक' असतो. त्या शिक्षकाचा वर्ग कायमच भरलेला आणि अगदी शांत असतो. अशा आवडत्या शिक्षकाची तात्काळ बदली झाली तर... विचारही करवत नाही ना... असाच काहीसा प्रकार एका शाळेत घडला आहे. आणि या फेव्हरेट शिक्षकाच्या बदलीवर आता विद्यार्थ्यांनीच आंदोलन पुकारलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार घडलाय तामिळनाडूच्या सरकारी साळेत. तिरूवल्लूरच्या वेलियागरामच्या शाळेत इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाची बदली झाली. आणि ही बदली रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी अगदी हमसून हमसून रडत आंदोलन केलं आहे. बुधवारी शाळेत हा सगळा प्रकार पाहायला मिळाला. बुधवारी जेव्हा विद्यर्थ्यांना कळलं की इंग्लिश शिक्षक जी भगवान यांची बदली झाली असून आता ते दुसऱ्या शाळेत जात आहेत. तेव्हा जवळपास 100 विद्यार्थ्यांनी शिक्षकांना घेराव घातला. शिक्षकाला मिठी मारून विद्यार्थ्यांनी आपलं भावनिक आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने शिक्षकांची बदली 10 दिवस पुढे ढकलली आहे. 



फेव्हरेट शिक्षकाची गोष्ट....


शाळेत दोन इंग्रजी शिकवणारे शिक्षक आहेत. जी भगवान 6 ते 10 च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत असतं. मंगळवारी त्यांची बदली झाल्याचं कळलं. त्यांच्या जागेवर बुधवारी दुसरे शिक्षक रूजू झाले. जी भगवान शिक्षकांनी शाळेच निरोप घेतला अगदी त्याच वेळी या विद्यार्थ्यांनी रडून रडून शिक्षकांना घेराव घातला. अगदी त्यांना घट्ट मिठी मारत आंदोलनाला सुरूवात केली.


शिक्षकांच्या वस्तू विद्यार्थ्यांनी लपवल्या 


शिक्षकांनी आपली शाळा सोडून जावू नये यातकता विद्यार्थ्यांनी जी भगवान यांच्या बऱ्याच गोष्टी लपवल्या. एवढंच काय तर विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या स्कूटरची चावी देखील लपवली. तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची बॅग लपवली. विद्यार्थ्यांच्या या भावनिक विरोधाला बघून इतर शिक्षक देखील स्तब्ध झाले.