Crime News : इंटरनेटच्या (Internet) युगात मोबाईल (Mobile) वापरणं काळाची गरज बनलंय. पण आपल्या लहान मुलांना मोबाईल देण्याआधी पालकांनी त्याच्या परिणामाचा विचार करायला हवा. आजकाल शाळेतल्या मुलांच्या हातातही महागडे मोबाईल दिसतात. पण यामुळे मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे. अभ्यास, मैदानी खेळ सोडून मुलं तासनतास गुंतत चालली आहेत. त्यातच इन्स्टा रिलचं (Insta Reels) वेडही मुलांना लागलंय. लहान-लहान व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर (Social Media) शेअर करायचे. लाईक (Like) आणि कमेंट (Comments) मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचीही या मुलांची तयारी असते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीने उचललं धक्कादायक पाऊल
इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रसिद्ध असलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीने आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं. अभ्यास करण्यासाठी आई-वडील ओरडल्याने या मुलीला राग आला आणि तीने गळपास घेत आत्महत्या केली. प्रतीक्षा असं या मुलीचं नाव आहे. नऊ वर्षांची प्रतीक्षा 'इन्स्टा क्वीन' (Insta Queen) म्हणून ओळखली जात होती. आपले अनेक व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करायची. आणि या व्हिडिओंना हजारोंनी लाईकही मिळायचे.


अभ्यासासाठी ओरडल्याचा राग
प्रतीक्षा घराबाहेर खेळत असताना तिचे वडील कृष्णमुर्ती यांनी पाहिलं. त्यांनी तिला घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगितलं आणि तिला घराची चावी दिली. त्यानंतर ते आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी निघून गेले. काही तासांनी ते घरी परतले, पण घर आतून बंद असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला आणि आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कृष्णमुर्ती घाबरले, त्यांनी घराच्या मागची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. पण समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 


प्रतीक्षाने घेतला होता गळफास
प्रतीक्षाने टॉलवेलने गळफास लावून घेतला होता. वडीलांनी तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण दुर्देवाने उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. 


मोबाईलमध्ये गेम खेळतो म्हणून पालक ओरडले
दरम्यान, अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्येही घडली आहे. मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केल्याने 10 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. लखनऊमधल्या चितवापूर परिसरात ही घटना घडली. पतीच्या मृत्यूनंतर कोमल या आपला मुलगा आरुष (वय 10) आणि मुलगी विदिशा (वय 12) यांच्यासह राहात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरुष अनेक दिवसांपासून शाळेत जात नव्हता. त्याला मोबाईलवर खेळण्याचं व्यसन लागलं होतं. यावरुन आई त्याला अनेकवेळा ओरडायची. घटनेच्या दिवशीही याच गोष्टीवरुन आई त्याला ओरडली आणि त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. पण याचा आरुषला राग आला आणि त्याने गळफास घेत आत्महत्या केली.