मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशात आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत देशात ११ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तामिळनाडूत मदुराईमध्ये बुधवारी सकाळी ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तामिळनाडूत झालेला हा पहिला मृत्यू अशी नोंद आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूत मृत पावलेल्या या व्यक्तीला कोरोनासोबतच अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनचा आजार होता. राजाजी रूग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १८पर्यंत आहे. मंगळवारी आणखी सहा नवीन रूग्ण आढळले आहेत. यात तीन महिलांचा देखील समावेश आहे. 



तामिळनाडू मृत्यू झालेल्या या रूग्णाचा कोणताही परदेश दौऱ्याचा इतिहास नाही. त्यांनी कोणताही प्रवास केला नव्हता याची देखील नोंद नाही. या रूग्णाला अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनबरोबर श्र्वसनाही विकार होता. हा रूग्ण स्टेरॉइडवर गोता. आतापर्यंत देशात ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील २१ दिवस म्हणजे १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' पुकारला आहे. या काळात नागरिकांना घरात राहूनच कोरोनाशी दोन हात करायचं आहे. कोरोनाचा मुळापासून नायनाट करायचा असेल तर घरात राहणं हेच सोईच आहे.