Tantalum Rare Metal Found In Sutlej: इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणझेच आयआयटी रोपडने पंजाबमधील सतलज नदीमधील रेतीखाली टँटलमचा शोध लावला आहे. टँटलम हा फारच दुर्मिळ धातू आहे. आयआयटीने सिव्हील इंजीनिअरिंग विभागाच्या प्राध्यापिक रश्मी सेबॅस्टियन यांच्या नेतृत्वाखालील टीमने टँटलमचा शोध लावला आहे. हा धातू केवळ दुर्मिळ नाही तर फारच मौल्यवान आहे. या धातूचे मुबलक साठे सापडल्यास भारत मालामाल होणार आहे. 


टँटलमचं वैशिष्ट्य काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिक दृष्ट्या तयार करण्यात आलेल्या पिरिऑडिक टेबलमध्ये टँटलमचा एटॉमिक नंबर 73 आहे. कोणत्याही पदार्थामधील अण्विक गुणधर्म या एटॉमिक क्रमांकावरुन अधोरेखित होतो. टँटलम राखाडी रंगाचं असतं. या धातूचं वजनही फार असतं. हा धातू कधीच गंजत नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा टँटलम हवेच्या संपर्कात येतं तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर ऑक्साइडचा एक थर जमा होतो. हा थर हटवणे फारच कठीण असते.


सोन्याप्रमाणे वाटेल तो आकार देता येतो


अमेरिकी ऊर्जा विभागाशी संबंधित तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, टँटलम धातूवर उणे 150 डिग्री तापमानामध्येही कोणत्याही पद्धतीच्या रासायनिक प्रक्रिया होऊ देत नाही. टँटलमवर कोणताही परिणाम होत नाही. टँटलम हे एवढं लवचित आहे की सोन्याप्रमाणे त्याला वाटेल तो आकार देता येतो.


पहिल्यांदा कधी सापडला?


सन 1802 मध्ये स्वीडनमधील संशोधक एंटर्स गुस्ताफ एकेनबर्ग यांनी पहिल्यांदा टँटलमचा शोध लावला. सुरुवातीला गुस्ताफ यांनी नियोबियमचा शोध लावल्याचं वाटलं. या दोन्ही धातूंमध्ये फार साधर्म्य आहे. 1866 साली स्वीडनमध्ये अन्य एका वैज्ञानिक जीन चार्ल्स यांनी ही गुंतागुंत सोडवली. जीन यांनीच टँटलम आणि नोयोबियम दोन वेगळे धातू असल्याचं सिद्ध केलं. टँटलमचं नाव पुरातन ग्रीक राजाच्या नावावरुन ठेवलं आहे. ग्रीसचा हा राजा फारच श्रीमंत होता. 


वापर कशासाठी होतो? 


टँटलमचा वापर कशासाठी होतो? असा प्रश्न तुम्हालही पडला असेल तर अगदी सोप्या शब्दात सांगायंच झाल्यास, जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये टँटलमचा वापर केला जातो. कॅमेसिटरपासून ते कंडक्टरपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये टँटलमचा वापर होतो. तसेच मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेराबरोबरच सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही टँटलमचा वापर होतो.


प्लॅटिनमला पर्याय


टँटलमला प्लॅटिनमला पर्याय म्हणून ही वापरला जातो. टँटलमच्या तुलनेत प्लॅटिनम फारच महाग आहे. 


भारत होणार मालामाल


टँटलम हे सुरक्षा क्षेत्रासाठी फार महत्त्वाचं मानलं जातं. रासायनिक कारखान्यापासून अण्विक केंद्रापर्यंत आणि क्षेपणास्त्रांपासून फायटर जेटमध्येही टँटलमचा वापर होतो. त्यामुळेच सतलजमध्ये टँटलम सापडणं फार महत्त्वाचं मानलं जात आहे. टँटलमच्या जोरावर भारत चीनबरोबरच वेगवगेळ्या देशांना सुरक्षेसंदर्भात मागे टाकेल.