Crime News : विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी समाजामध्ये अजुनही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला जात आहे. अशातच अंधश्रद्धेला बळी पडत दोन वर्षांपासून घरामधील काम करणाऱ्या मोलकरणीला निर्वस्त्र करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांत्रिकाच्या सांगण्यावरून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. दक्षिण दिल्लीमधील ही घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
10 महिन्यांमागे घरामध्ये चोरी झाली होती, चोरीचा उलगडा करण्यासाठी घराच्या मालकिनीने 9 ऑगस्टला एका तांत्रिकाला बोलावले. तांत्रिकने घरातील सर्व नोकरांना भात आणि चूना देऊन तो खायला द्यायला सांगितला. ज्या नोकराचं तोंड लाल होईल तो चोर असल्याचं तांत्रिकाने मालकिनीला सांगितलं. 
 
तांत्रिकाने भात आण चुना दिला होता तो खाऊन महिला मोलकरणीचं तोंड लाल झालं. तांत्रिकाच्या या प्रयोगानुसार महिलेचं तोंड लाल झाल्यामुळे घर मालकीन चिडली. त्यानंतर तिने महिलेला मारहाण केली, इतकंच करून मालकीन राहिली नाही. तिने मोलकरणीला निर्वस्त्र करत 24 तास एका खोलीमध्ये ठेवलं. 


असा झाला खुलासा 
मोलकरणीने 10 ऑगस्टच्या रात्री बाथरूममध्ये जाण्याचा बहाणा करत उंदिर मारण्याचं औषध खाल्लं. त्यानंतर आरोपी मालकिनीने तिला रूग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच मैदनगढी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पीडितेचा जबाब नोंदवून घेतला असून पूढील तपास पोलीस करत आहे.