मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. यावेळी बाजाराला ज्या सेक्टरमधून सपोर्ट मिळणार आहेत. ते सेक्टर म्हणजेच रिअल इस्टेट आणि इंफ्रास्ट्रक्चर होय. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सध्या जबरदस्त डिमांड दिसून येत आहे. सरकार या सेक्टरला बूस्ट देण्यासाठी योजना आणू शकते.  असे कयास बांधले जात आहेत. त्यामुळे बजेट आधी या सेक्टरशी संबधीत चांगला फंडामेंटल असलेल्या शेअरमध्ये पैसा गुंतवल्यास नक्कीच गुंतवणूकदारांना चांगला फायदा होऊ शकतो. असाच एक शेअर झी मीडियाच्या रिसर्च टीमने तुमच्यासाठी निवडला आहे. तो शेअर म्हणजेच Hemisphere Properties India Ltd होय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hemisphere Properties India Ltd  हा बेस्ट बजेट पिक शेअर आहे. सध्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये बूम आहे. बजटमध्येही त्यासंबधी काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मजबूत फंडामेंटल असलेला रिअल इस्टेट शेअर म्हणून Hemisphere Properties India Ltd  कडे पाहिले जात आहे.


ही कंपनी टाटा ग्रुपचा एक भाग आहे.(TATA Group)या कंपनीत टाटा ग्रुपची 22.5 टक्के भागिदारी आहे. हा शेअर येत्या काळात 200 ते 250 रुपयांपर्यंत उसळी घेण्याची शक्यता आहे.


Hemisphere Properties India Ltd  रिअल इस्टेट कंपनी 2005 मध्ये इनकॉर्पोरेट झाली होती. कंपनीकडे मोठ्या प्रमाणात लॅंड बँक आहे. टाटा कम्युनिकेशनपासून कंपनीला 740 एकरची जमीन ट्रान्सफर झाली आहे. यातील 540 एकर जमीन एकट्या पुण्यात आहे. जेथे रेसिडेशिअल रिअल इस्टेटमध्ये मोठी प्रगती दिसू शकते.


येत्या काळात लॅंड डेव्हलपमेंटचे कंपनीचे नियोजन आहे. यासाठी कंपनी टाटा हाऊसिंग आणि टाटा कंस्ट्रक्शनसोबत मिळून काम करू शकते. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये चांगल्या तेजीचे संकेत आहेत