Tata 1mg Health Partner:  जगभरात कोणत्याही क्षेत्रात मंदीचा फटका पहायला मिळतो पण एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये आर्थिक मंदी दिसून येत नाही आणि ते म्हणजे 'हेल्थ केअर अँड फार्मसी' (Health Care & Pharmacy). कोरोनाच्या काळात जवळ-जवळ सर्वच कामे ही ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. यामध्ये फार्मसी क्षेत्राचा देखील समावेश आहे. टाटा समुहाच्या 1mg या फार्मसी क्षेत्रातील कंपनीबद्दल लोकांमध्ये खुप विश्वास आहे. यामुळे ही कंपनी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या कंपनीसोबत काम करण्याच्या संधीबद्दल जाणून घ्या...  


प्रत्येक महिन्याला कमवा हजारो रुपये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-फार्मसी क्षेत्रातील टाटा समुहाच्या 1mg सोबत काम करण्याची संधी कंपनीकडून देण्यात येत आहे. '1mg Health Partner' या प्रोग्रामच्या माध्यमातून देशभरातील लोकांना हेल्थ केअरबद्दल समजून सांगणे आणि योग्य किंमतीमध्ये सेवा उपलब्ध करुन देणे ही कामे करावे लागतील. या कामांसाठी कंपनीकडून हेल्थ पार्टनर्सचा शोध घेत आहे. आत्तापर्यंत 600 हेल्थ पार्टनर या प्रोग्रामद्वारे जोडले गेले आहेत आणि ते प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहेत.


टाटा 1mg हेल्थ पार्टनर का व्हावं?


हेल्थ पार्टनरच्या मदतीने तुम्हाला उद्योजक बनण्याची संधी मिळत आहे. यामध्ये तुम्हाला सर्व डिलिव्हरीवर इंसेंटिव्ह मिळेल. कंपनीकडून तुम्हाला मार्केटिंग आणि तंत्रज्ञान शिकवले जाईल. व्यवसाय कसा यशस्वी करायचा याचं प्रशिक्षण दिले जाईल. या सगळ्याशिवाय टाटा समूहासोबत काम करण्याची संधी आहे. या कामामुळे तुमचं  कुटुंब आणि समाज आनंदी आणि निरोगी बनू शकते.


हेल्थ पार्टनरचे काम काय आहे?


हेल्थ पार्टनरचे काम टाटा 1MG साठी लीड निर्माण करणे आहे. या प्लॅटफॉर्मबद्दलॉ लोकांना जागरूक करणे. त्यांना 1MG द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली जाईल. ऑर्डर मिळवण्यासाठी ग्राहकांना मदत करावी लागेल. जे ग्राहक या प्लॅटफॉर्मसोबत सहभागी होतील, त्यांना पुन्हा या प्लॅटफॉर्मवर आणावं लागेल आणि हेल्थ पार्टनर्सला ही सेवा सतत वापरावी लागेल.


अर्ज कसा करायचा?


तुम्हालाही हेल्थ पार्टनर बनायचं असेल, तर Tata 1mg च्या वेबसाइटवर जा आणि तुमची सर्व माहिती भरा. प्रोफाइल शॉर्टलिस्ट केल्यानंतर, तुम्हाला कंपनीकडून कॉल केला जाईल. त्यानंतर पॅन कार्ड, जीएसटी, अ‍ॅड्रेस प्रूफसह अनेक माहिती शेअर करावी लागेल. प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी 15,000 रुपये नॉन-रिफंडेबल ऑन-बोर्डिंग शुल्क देखील आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण होईल.


तुम्ही किती कमावणार?


वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, जर एखाद्या हेल्थ पार्टनरला एका महिन्यात 300 ऑर्डर मिळाल्या आणि प्रत्येक ऑर्डरचे सरासरी मूल्य 500 रुपये असेल, तर एकूण मूल्य (300 * 500 = 150000) रुपये 1.5 लाख होईल. यावर तुम्हाला दरमहा 7650 रुपये कमिशन मिळेल. अधिक ऑर्डर मिळाल्यास कमाई देखील अधिक होईल. जर तुमचे ग्राहक या प्लॅटफॉर्मला वारंवार भेट देत असतील तर तुमची कमाई निश्चित होईल.