मुंबई : डिसेंबर तिमाही निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत. तुम्हीही गुंतवणूकीसाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर, टाटा ग्रुपचा उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक चांगली निवड ठरू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रोकरेज हाऊसेसने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.  लक्ष्यातही सुधारणा केली आहे. 
डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची कामगिरी समाधानकारक असल्याचे ब्रोकरेज सांगतात. बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येही टाटा मोटर्सच्या शेअरचा समावेश आहे.


ब्रोकरेज फर्मचा सल्ला


टाटा मोटर्सच्या निकालांवर, ब्रोकरेज फर्म जेफरीजचे म्हणणे आहे की कंपनीच्या व्यवसायात मोठी प्रगती अपेक्षित आहे. ब्रोकरेजने टाटा मोटर्सचे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच शेअरसाठी किंमत 625 रुपयांवरून 635 रुपये करण्यात आली आहे.


मोतीलाल ओसवाल म्हणतात की, ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीची कामगिरी समाधानकारक आहे. जग्वार लँड रोव्हरच्या (JLR) मोठ्या मागणीमुळे कामगिरी सुधारत आहे.


वस्तूंच्या किमतीतील स्थिरता आणि चांगली मागणी भारतीय व्यवसायासाठी सकारात्मक ठरत आहे. 


ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर 'बाय' रेटिंगसह, 600 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. 


Tata Motors वर 25% परतावा अपेक्षित 


2 फेब्रुवारीच्या सत्रादरम्यान टाटा मोटर्सची किंमत 509 रुपये होती. गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत सुमारे 25 टक्के भरघोस परतावा मिळू शकतो. मागील वर्षातील परताव्यावर नजर टाकली तर गुंतवणूकदारांनी 58 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवला आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 70 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली.


झुनझुनवाला यांचा विश्वास कायम


BSE वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2021 (Q3FY22) तिमाहीसाठी टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील त्यांची हिस्सेदारी 1.11 टक्क्यांवरून 1.18,32 टक्क्यांपर्यंत वाढवली.  2 फेब्रुवारी 2022 रोजी झुनझुनवाला यांचे होल्डिंगचे मूल्य 1,996.8 कोटी रुपये होते.