मुंबई : Tata group share :टाटा स्टीलचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी या स्टॉकवर आपले मत मांडले आहे. या स्टॉकवर गुंतवणूक करण्याआधी त्याविषयी जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा समूहाची दिग्गज कंपनी असलेल्या टाटा स्टीलने नुकतेच डिसेंबर तिमाहीचे निकाल सादर केले. कंपनीने आर्थिक वर्ष 22-23 च्या तिसऱ्या तिमाहीत दुप्पट निव्वळ नफा सादर केला आहे. टाटा स्टीलच्या मजबूत निकालांनंतर, अनेक जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी या स्टॉकसाठी लक्ष्य वाढवले ​​आहे.(Tata Steel Stock)


तुमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये टाटा समूहाचा हा मजबूत स्टॉक असेल किंवा आता या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे असतील, जाणून घ्या ब्रोकरेज हाऊसेसने किती लक्ष्य ठेवले आहे. सध्या टाटा स्टीलची प्राइज 1183 रुपये आहे.


कंपनीची चांगली कमाई


जागतिक ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनने टाटा स्टीलच्या निकालांनंतर येथे ओव्हर-वेटचे रेटिंग दिले आहे. खरेदीसाठी ब्रोकरेज कंपनीने 1850 वरून लक्ष्य किंमत 1900 रुपये वाढवले आहे. 


कंपनीचे म्हणणे आहे की, यावर्षी देखील टाटा स्टीलने मजबूत आणि ठोस निकाल सादर केले आहेत. ब्रोकरेज हाऊसचा विश्वास आहे की, वित्तीय वर्ष 2022 प्रमाणेच, आर्थिक वर्ष 2023 मध्ये टाटा स्टीलची प्रगती होईल.


टाटा स्टीलमध्ये गुंतवणूक - BOFA


ब्रोकरेज कंपनी BOFA ने टाटा स्टीलवर खरेदीचा सल्ला दिला. तिमाही निकाल पाहता, कंपनीने टाटा स्टीलवर गुंतवणूकीसाठी 1430 चे लक्ष्य दिले आहे.