मुंबई : सध्याच्या परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगले स्टॉक शोधत असाल, तर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर एक नजर टाकू शकता. टाटा समूहाचा स्टॉक Trent Ltd. हा स्टॉक पुढील 1 वर्षात चांगला परतावा देऊ शकतो. ट्रेंट लि. दिग्गज गुंतवणूकदार राधा किशन दमाणी यांचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे. ब्रोकरेज हाऊस एडलवाईसने या स्टॉकवर विश्वास व्यक्त केला आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेंटबद्दल सांगायचे तर, ही टाटा समूहाची रिटेल शाखा आहे, जी अनेक लोकप्रिय ब्रँड चालवते. या वर्षी आतापर्यंत स्टॉकची कामगिरी चांगली आहे.


आर.के.दमाणी यांची गुंतवणूक 


राधाकिशन दमानी, स्टॉक मार्केटमधील एक अनुभवी गुंतवणूकदार आणि राकेश झुनझुनवाला यांचे गुरू असल्याचे मानले जाते. त्यांनी ट्रेंट लिमिटेड सुरू केली. या कंपनीत दमानी यांची एकूण 1.5 टक्के भागीदारी आहे.


हा स्टॉक त्याच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळापासून समाविष्ट आहे. त्यांनी सप्टेंबर तिमाहीत शेअरहोल्डिंग पॅटर्न बदलला नाही. त्यांच्याकडे सध्या कंपनीचे 566.4 कोटी रुपयांचे शेअर्स आहे.


किती परतावा मिळू शकेल?


ब्रोकरेज हाऊस एडलवाईसने ट्रेंटच्या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून आणि 1198 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. शेअरची सध्याची किंमत 1045 रुपये आहे.


म्हणजेच लक्ष्य साध्या झाल्यास यातील प्रत्येक शेअरवर 153 रुपये किंवा 15 टक्के परतावा मिळू शकतो.


ही कंपनी वेस्टसाइड चालवते, तर झुडिओ नावाचा एक लोकप्रिय ब्रँड आहे, जो सर्व वर्गातील लोकांसाठी फॅशन उत्पादने ऑफर करतो.


व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, झुडिओने आता प्रगतीच्या पुढील टप्प्यात प्रवेश केला आहे. Zudio सतत विस्तारत आहे आणि चालू आर्थिक वर्षात अनेक नवीन स्टोअर्स उघडली आहेत.


आगामी काळात दरवर्षी 50-70 नवीन स्टोअर्स उघडण्याचे ट्रेंटचे लक्ष्य आहे. कंपनीने आपला खर्चही कमी केला आहे.


यापूर्वी, वेस्टसाइड कलेक्शन फक्त टाटा क्लीकवर होते. ट्रेंटने टाटा डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्याचीही योजना आखली आहे. त्याचबरोबर वेस्टसाइड अॅपही येत्या काही महिन्यांत येण्याची शक्यता आहे.


कंपनीच्या वाढीबाबत व्यवस्थापन पूर्णपणे सकारात्मक आहे. या सगळ्यामुळे येत्या काही दिवसांत शेअरमध्ये चांगली ऍक्शन होण्याची आशा आहे.


यावर्षी 55% मिळाला परतावा 


ट्रेंट लिमिटेडच्या स्टॉकने या वर्षी आतापर्यंत 55 टक्के परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 675 रुपयांवरून 1045 रुपयांपर्यंत वाढली आहे.


गेल्या एका वर्षात स्टॉकचा परतावा 54 टक्के झाला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने 6 टक्के नकारात्मक परतावा दिला असला तरी मूल्यांकन चांगले दिसत आहे.