मुंबई : जर तुम्ही नवीन कार खरेदी करीत असाल, तर अनेक प्रकारचे दस्ताऐवज आणि प्रक्रियांमधून तुम्हाला जावं लागतं. एका शोरूममधून दुसऱ्या शोरूममध्ये आपण फिरत राहतो. तुमचे अनेक दिवस योग्य कार शोधण्यात जातात. परंतू आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. Tata Group ने ग्राहकांची ही अडचण सोडवण्यासाठी मोठी तयारी केली आहे. आता कार खरेदी करणे मोबाईल किंवा फूड ऑर्डर करण्याइतकं सोपं होणार आहे.


Tata Neu वर मिळणार कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा ग्रुपने नुकतेच एक Tata Neu हे ऍप लॉंच केले आहे. कंपनी आता याच ऍपच्या माध्यमातून प्रवासी वाहनांची विक्री करणार आहे.


Tata Neuची मूळ कंपनी टाटा डिजिटलचे सीईओ प्रतीक पाल यांनी माहिती दिली की, कंपनीच्या इतर ब्रँडप्रमाणे टाटा मोटर्सला Neu प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू आहे. पुढील काही महिन्यांत तनिष्क, टायटन, एअर इंडिया आणि ताज हॉटेल्स प्रमाणे टाटा मोटर्सला या ऍपशी जोडले जाईल.