TATA Power AGM | टाटा ग्रुपकडून गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; `या` शेअरसाठी एक्सपर्ट्सचा Buy Call
टाटा पॉवरची येत्या पाच वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला येत्या काही वर्षांत चांगला नफा मिळू शकतो.
मुंबई : TATA Power Share:जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी! टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला बंपर फायदा मिळू शकतो. सध्या या स्टॉकची किंमत रु. 214.50 आहे. येत्या काही दिवसांत या शेअरची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. मार्केट तज्ज्ञही या शेअरबाबत उत्साही असून ते शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
सध्या टाटा पॉवरची उत्पादन क्षमता 13,500 मेगावॅट आहे. म्हणजेच येत्या पाच वर्षांत ते दुप्पट करण्याची योजना आहे. यामध्ये अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वाटा 34 टक्के आहे.
कंपनीच्या भविष्यातील योजना
टाटा पॉवरचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या एजीएममध्ये (वार्षिक सर्वसाधारण सभेत) सांगितले की, आम्ही येत्या 5 वर्षांत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत.
कंपनीच्या भविष्यातील योजनांबाबत एका भागधारकाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. चंद्रशेखरन यांनी आपल्या भाषणात सांगितले की टाटा पॉवरने 2026-27 पर्यंत त्यांची उत्पादन क्षमता 30,000 मेगावॅटपर्यंत नेण्याची योजना आखली आहे.
चालू आर्थिक वर्षात 14 हजार कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट
याशिवाय, कंपनीचा अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओ आता 34 टक्क्यांवरून 2027 पर्यंत 60 टक्क्यांपर्यंत वाढेल. 2030 पर्यंत हे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे.
तज्ज्ञांचे मत
बाजारातील तज्ज्ञ टाटा पॉवरच्या शेअरबाबत उत्साही असून खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांनी टाटा पॉवरची लक्ष्य किंमत 250 रुपये ठेवली आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीपेक्षा 18 ते 20 टक्क्यांनी वाढू शकते.
7 एप्रिल 2022 आणि 28 जुलै 2021 रोजी शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक 298 रुपये आणि 118.40 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता. येत्या काळात या शेअरमध्ये वाढ होण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.