रांची : Tata Steel Plant Blast Latest Update: झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला असून त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जमशेदपूर घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट केले की, जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने जिल्हा प्रशासन जखमींवर तात्काळ उपचारासाठी कार्यवाही करत आहे.


जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक 


अपघातात जखमी झालेल्या मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांचे 11 सदस्यीय पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



टाटा स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लागलेली भीषण आग विझवण्याचे काम सुरु आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.