नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी टाटा टेलिसव्हिसेसचे विलिनीकरण आता भारती एअरटेलमध्ये होणार आहे. या कराराने जगातील सर्वात मोठ्या दूरसंचार बाजारातील एक असलेल्या भारतात एकीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या विलीनीकरणामुळे टाटा टेलिसर्व्हिसेस आणि टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्रातील चार कोटी ग्राहक भारती एअरटेलशी जोडले जाणार आहे. या सौद्यामुळे टाटा आपल्या टेलिकॉम क्षेत्रातील आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. 


या करारानुसार कोणतेही कर्ज नाही किंवा रोख रक्कम नाही असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे एअरेटल यात टाटा सर्व्हिसेसच्या ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जात कोणतीही भागीदारी नाही करणार किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम देणार आहे. टाटा कडून खरेदी करण्यात आलेले स्पेक्ट्रेम साठी ९००० ते १०००० कोटी रुपयांतील ७० ते ८० टक्के हिस्सा टाटाच भरणार आहे. 



भारतीय एअरटेलचे चेअरमनचे सुनील मित्तल यांनी हा करार भारतीय  टेलिकॉम उद्योगाचे सुदृढीकरणच्या दिशेने चांगला पाऊल आहे.