मुंबई : सणासुदीच्या दिवसांमध्ये टाटा टिगोरच्या इलेक्ट्रिक (Tata Tigor EV) वर्जनला लॉंच करण्यात आले आहे. कंपनीने कारची किंमत 11.99 लाख रुपये असल्याची माहिती दिली आहे. टाटा टिगोर इलेक्ट्रिक तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. टाटा मोटर्सने नवीन टिगोर ईव्हीला 18 ऑगस्ट रोजी अनवील केले होते. अपडेटेड टिगोर ईव्हीमध्ये जिपट्रॉन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. नेक्सॉन ईव्ही  (Nexon EV)नंतर टाटा मोटर्सची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. (New Tata Tigor EV Launched)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या मते  नवीन टाटा टिगोर ईव्ही तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये टाटा टिगोर ईव्ही एक्स ई (Tata Tigor EV XE )ची किंमत 11.99 लाख रुपये आहे. Tigor EV XM ची किंमत 12.49 लाख रुपये आहे. Tigor EV XZ+ ची किंमत 12.99 लाख रुपये आहे.


टाटा मोटर्सच्या अधिकृत संकेतस्थळानुसार भारतात टाटा टिगोरचे इलेक्ट्रिक वर्जन एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 306 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. ही कारची ARAI certified रेंज आहे. 


 1 तासात 80 टक्के चार्ज
 नवीन टाटा टिगोर ईव्हीला फास्ट चार्जरने 1 तासात 80 पर्यंत चार्ज करता येते. तसेच रेग्युलर चार्जरने साधारण 8.5 तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते. ही कार 15 A च्या सॉकेट ने चार्ज केली  जाऊ शकते. हे सॉकिट आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये सहज उपलब्ध असते.


टाटाच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 55 kWचे इलेक्ट्रिक मोटर आणि 26 kWhची लिथियम आयन बॅटरी पॅक असणार आहे. ज्यामध्ये 74 bhp(55kW)पर्यंत पावर आणि 170 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. टाटा मोटार्स या कारवर 8 वर्ष आणि 1 लाख 60 हजार किलोमीटर पर्यंत बॅटरीची वारंटी देत आहे.