मुंबई : आयपीओ मार्केटमध्ये सध्या तेजी दिसून येत आहे. जुलै महिन्यात एकापाठोपाठ एक कंपन्यांचे आयपीओ ओपन होत आहेत. अशातच तत्व चिंतन फार्मा केमिकलचा आयपीओ 16 जुलै रोजी ओपन होत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 20 जुलै पर्यंत ओपन असणार आहे. 17 आणि 18 जुलै शनिवार आणि रविवारी आयपीओच्या माध्यमांतून 500 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे नियोजन आहे. तत्व चिंतन फार्माने आयपीओसाठी प्राइस बँडसुद्दा तयार केले आहे. जर तुम्ही या कंपनीत पैसे लावण्यातस इच्छुक असाल तर. जाणून घ्या संपूर्ण माहिती...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1073-1083 रुपये प्राइस बँड
तत्व चिंतन फार्मा केम कंपनीने आयपीओची प्राइस बँड 1073 ते 1083 रुपये निश्चित केली आहे. आयपीओमध्ये 225 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जाणार आहेत. तसेच 275 कोटी रुपयांचे OFS असणार आहे. सध्याचे प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर या माध्यमांतून आपली भागिदारी कमी करणार आहे. कंपनीचा स्टॉक BSE आणि NSE दोन्ही ठिकाणी लिस्ट होणार आहे.


कमीत कमी किती गुंतवणूकीची गरज


आयपीओसाठी कंपनीने 13 शेअर्सचा एक लॉट निश्चित केला आहे. कमीत कमी 1 लॉट साइजसाठी बोली लावण्यात येईल. अपर प्राइज बँड 1083 च्या हिशोबाने 14079 रुपये गुंतवावे लागणार आहेत. जास्तीत जास्त 14 लॉट म्हणजेच 182 शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. म्हणजेच जास्तीत जास्त 1 लाख 97 हजार रुपये गुंतवता येतील.


रिटेल गुंतवणूकांसाठी किती टक्के राखीव


तत्व चिंतन फार्मा केमच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के भाग राखीव आहे. 50 टक्के भाग संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. तसेच 15 टक्के भाग हा गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे.