मुंबई : स्पेशिएलिटी केमिकल बनवणारी कंपनी तत्व चिंतन फार्मा केमिकलची शेअर बाजारात एन्ट्री झाली आहे. तत्व चिंतनचा स्टॉक बीएसईवर 95 टक्के प्रीमियमसोबत 2112 रुपयांवर लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये अप्पर प्राइज बॅंड 1083 रुपये होता. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओत पैसे गुंतवले तसेच ज्यांना तो शेअरही मिळाला त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. हा आयपीओ वर्षातील दुसरा सर्वात जास्त सब्सक्राइब होणारा आयपीओ बनला आहे. हा आयपीओ 500 कोटींचा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद
तत्व चिंतन फार्मा केमिकलच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला आहे. आयपीओने शेवटच्या दिवशी 180 पट जास्त सब्सक्राइब केला होता.


तत्व चिंतन फार्मा केमिकल आयपीओमध्ये रिटेल गुतवणूकदारांसाठी 35 टक्के भाग राखीव होता. त्यासाठी 35 पट बोली लागली. 50 टक्के भाग संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखिव होता. त्यासाठी 185 पट बोली लागली. तसेच 15 टक्के भाग गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखिव होता.