नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच सात जवानांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने देशभरात हळहळ निर्माण झाली होती. दरम्यान दोन दिवसांनंतर त्यांच्या मृतदेहांना सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने संतापाचे वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेंनतर रविवारी कार्डबोर्डमध्ये बांधलेले प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळेलेले जवानांचे मृतदेह पाहायला मिळाले. त्यामूळे लोकांचा संताप अनावर झाला आहे. मृत सैनिकांना नेहमीच सन्मानपूर्वक वागणूक मिळाली आहे, कार्डबोर्डमध्ये मृतदेह गुंडाळणे एक चूक होती असे ट्विट सैनिक दलातर्फे करण्यात आली. 
उत्तर सैन्य कमांडचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल (निवृत्त ) एच. एस पनाग यांनी या  मृतदेहांचे फोटो ट्विट केले.



तसेच त्यावर एक संदेशही त्यांनी लिहिला, 'सात तरुण मातृभुमीच्या रक्षणासाठी काल सकाळी घरातून बाहेर पडले आणि या पद्धतीने आपल्या घरी आले.'   मृतदेह हे बॉडी बॅग्ज, लाकडी बॉक्समधून नेल्याची खात्री केली जाईल असे ट्विट सैन्य अतिरिक्त माहिती संचालनालयातर्फे करण्यात आले.
तसेच "मृत सैनिकांना नेहमी सन्मान दिला जातो.  मृतदेह हे बॉडी बॅग्ज, लाकडी बॉक्समधून नेल्याची खात्री केली जाईल.  जवानांचे मृतदेह अशाप्रकारे हाताळणे ही चूक होती.  एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटीमध्ये या मृतदेहांचे फोटो काढण्यात आले होते.  
सैनिकांचे मृतदेह निश्चित स्थानी नेताना सैन्य बॉडी बॅग्जचा वापर अवश्य करायला हवा असे लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) पनाग यांनी सांगितल.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जनतेतून राग व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी  एमआय -१७ व्ही ५ हेलिकॉप्टर अपघातात दोन वैमानिकांसह पाच हवाई दलाचे कर्मचारी दोन सैनिकांचा मृत्यू झाला होता.