मुंबई :  इनकम टॅक्स न भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. जे लोक इनकम टॅक्स भरत नाहीत त्यांच्यासाठी सरकार नियम अधिक कठोर करणार आहे. 1 जुलैपासून टॅक्स अशा लोकांकडून अधिक TDS आणि TCS वसूल केला जावू शकतो. अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आयकर विभागाने एक नवी व्यवस्था तयार केली आहे. ज्यानुसार 1 जुलैपासून अधिक टॅक्स भरावा लागणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 च्या अर्थसंकल्पात एका तरतूदीचा समावेश करण्यात आला, ज्यानुसार दोन वर्षांपर्यंत इनकम टॅक्स फाईल न केल्यास सरकार TDS (Tax Deducted at Source) आणि TCS (Tax Collected at Source) आकारणार. त्यामुळे वेळेतचं इनकम टॅक्स फाईल  करा. 


सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस  (सीबीडीटी) देखील याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. सेक्शन  206AB आणि  206CCA तर्गत रिटर्न न भरणाऱ्यांवर जास्त टीडीएस / टीसीएस लावण्याचे म्हटले आहे. 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत.