Tax Slab in India: दिवाळीला भेटवस्तू देण्याची एक रित आहे. नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळतो. काही कंपन्या, नातेवाईक भेटवस्तू देखील देतात. सोन्याचं नाणं, गाड्या, हीरे, जमीन अशा स्वरूपात भेट म्हणून दिलं जातं. पण महागड्या भेटवस्तू मिळाल्यानंतर कर भरण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. भेटवस्तू कोणी दिली आणि त्याची किंमत काय? यावर कर अवलंबून असतो. आर्थिक वर्षात मिळालेल्या भेटवस्तूंवर आयकर कायद्यानुसार कर लागू शकतो, याबाबत अनेकांना माहिती नसते. महागड्या भेटवस्तूवर सूट नसेल तर आयकर भरावा लागेल. आर्थिक वर्षात मिळालेल्या भेटवस्तूंचे मूल्य 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, आयकर कायद्याच्या कलम 52(2) अंतर्गत कर आकारला जातो. या भेटवस्तू रोख किंवा कशाच्याही स्वरूपात असू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू करमुक्त आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्हाला भावंड, पालक किंवा जोडीदाराने भेटवस्तू दिल्या तर कोणताही कर भरावा लागणार नाही. दिवाळी भेटवस्तूंच्या करमुक्त श्रेणीत मित्रांना आणि नातेवाईकांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये समाविष्ट कराव्या लागतील आणि उत्पन्नाच्या स्लॅबनुसार कर भरावा लागेल.


Funny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल


भेटवस्तू त्या त्या प्रकारानुसार विभागली गेली आहे. उदाहरणार्थ, चेक, ड्राफ्ट किंवा रोख यांचे मूल्य आर्थिक वर्षात 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर त्यावर आयकर आकारला जाईल. दुसरीकडे भेटवस्तू घर किंवा जमिनीच्या स्वरूपात मिळाली असेल तर ती स्थावर मालमत्ता म्हणून गणली जाईल. मुद्रांक शुल्काची किंमत 50 हजारांपेक्षा जास्त असल्यास त्यावरही कर आकारला जाईल.


दुसरीकडे दागिने, शेअर्स किंवा सिक्युरिटीज, पेंटिंग्स ही जंगम मालमत्ता मानली जाते. या वस्तूंची किंमत 50 हजारांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर कर भरावा लागेल. दिवाळीला वाहन गिफ्ट मिळाल्यास मालमत्तेच्या कक्षेत येत नाही आणि त्यावर कर आकारला जाणार नाही.