Niramala Sitaraman on GST: मध्यंतरी केंद्र सरकारने GST मध्ये भरपूर वाढ केली होती. गेल्या अनेक दिवसांत महागाईमुळे सर्वसामान्यांना जबर फटाका बसला आहे. त्यामुळे आता याबाबत काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारही GST वर निर्णय घेण्याच्या तयारीत असून GST मधील 12 टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Group of ministers (GOM) च्या सदस्यांचे असे मतं आहे की ज्या वस्तूंवर 12 टक्के GST आकारला जातो त्याचा एकूण GST संकलनातला वाटा केवळ 8 टक्के आहे. अशावेळी 12 टक्के टॅक्स स्लॅब रद्द केला जाऊ शकतो. तेव्हा लवकरच या बैठकीबाबत आता निर्णय होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे GOM चे अध्यक्ष आहेत. ज्यांच्यावर GST बाबत सूट देण्याकरिता विचारविनिमय करण्याची जबाबदारी आहे.  


(GOM) च्या बेैठकीतील मुद्दे
जून 2022 मध्ये GST council च्या बैठकीत आपल्या शिफारसी (recommendations) सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. या महिन्यात (GOM) ची बैठक होणार असून त्यात वरील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या GST चे चार स्लॅब आहेत ज्यात 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के यांचा समावेश आहेत. याशिवाय हिरे आणि दागिन्यांवर 1.5 आणि 3 टक्के कर आकारला जातोय. सध्या लोणी, तूप, फळांचे रस, बदाम, 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चपला, खाद्यपदार्थ, वायर हिटर आणि 1,000 रुपयांपर्यंतच्या हॉटेल रूम्सवर 12 टक्के GST लागू होतो. अशावेळी जर टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले तर नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.