नवी दिल्‍ली : नोटबंदीदरम्यान बँकेत जमा केलेल्या पैशांवर सरकार नजर ठेवून आहे. अशा लोकांवर आता सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार आता लोकांनी जमा केलेल्या पैशांबाबतीत पुरावे मागणार आहे. जर याचा पुरावा ज्या लोकांकडे नसेल त्यांना त्यावर टॅक्स भरावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाने इनकम टॅक्स रिटर्न फाईल दाखल करणाऱ्या लोकांना जमा केलेल्या पैशांचा पुरावा दाखल करण्यास सांगितला आहे. पैशाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे. जर तुम्ही त्याचे पुरावे नाही देऊ शकले तर तुम्हाला ते इनकममध्ये दाखवावे लागणार आहे. त्यावर टॅक्स देखील भरावा लागणार आहे.


एखाद्या व्यकतीने जर नोटबंदी दरम्यान जमा केलेल्या पैशांचा स्त्रोत नाही दाखवू शकला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.