Tata Consumer-Tata Coffee Merger: टाटा ग्रुप हा देशाती सर्वात मोठ्या ग्रुपपैकी एक आहे. विशेष म्हणजे टाटा ग्रुपने देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. जेवणाच्या ताटातील मिठापासून ते विमानापर्यंत सर्वच गोष्टीत टाटा ग्रुप अग्रेसर आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे टाटा ग्रुपसंदर्भातील प्रत्येक अपडेट ग्राहक ठेवत असतात. दरम्यान टाटा ग्रुपसंदर्भात एक महत्वाची अपडेट येत आहे. टाटा ग्रुप कंपनी टाटा कन्झूमर प्रोडक्ट  (TCPL) चे टाटा कॉफीमध्ये (TCL)  विलीनीकरण  करत आहे. 2024 पासून   हे बदल दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून टीसीपीएल आणि टीसीएलचे विलनीकरण होणार असल्याची माहिती टाटा कंपनीकडून देण्यात आली. टाटा कॉफ़ीचे सर्व व्यवसाय स्वतःमध्ये विलीन करण्याची घोषणा केल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी टाटा ग्राहकाकडून ही घोषणा आली आहे.


TCPL ने टाटा कॉफीच्या सर्व व्यवसायांचे स्वतःचे किंवा तिच्या उपकंपन्यांसोबत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. ग्रुपमध्ये समन्वय आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या धोरणात्मक प्राधान्याच्या अनुषंगाने पुनर्रचना योजनेअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. 


नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या कोलकाता खंडपीठाने गेल्या महिन्यात TCL चे विलीनीकरण त्याच्या पूर्ण मालकीच्या TCPL आणि TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स (TBFL) मध्ये मंजूर केले होते.


TCL चा व्यवसाय TBFL पासून वेगळा केला जाणार आहे. यानंतर TCL चा उर्वरित व्यवसाय TCPL मध्ये विलीन केला जाईल. यामध्ये त्याचा एक्सट्रेक्शन आणि ब्रँडेड कॉफी व्यवसायाचा समावेश आहे. 


सामंजस्य करारानुसार TCL शेअरहोल्डर्सना TCL मध्ये त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक 10 इक्विटी समभागांमागे TCPL चे एकूण तीन इक्विटी शेअर्स मिळतील. ही प्रक्रिया टीसीएलच्या 22 इक्विटी शेअर्ससाठी टीसीपीएलचा एक इक्विटी शेअर जारी करून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


TCL च्या प्रत्येक 55 इक्विटी शेअर्समागे TCPL चे 14 इक्विटी शेअर्स विलीनीकरणासाठी जारी केले जातील. गुरुवारी बीएसईवर टीसीपीएलचा शेअर 1.47 टक्क्यांनी वाढून 1,042.10 रुपयांवर बंद झाला.