मुंबई : होळीआधी TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. Tata Consultancy services  आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ साठी पगारात वाढ करून देणार आहे. गेल्या ६ महिन्यांत असं दोनदा घडलंय, जेव्हा टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ ते ७ टक्क्यांनी पगारवाढ


६ ते ७ टक्क्यांनी ही पगारवाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पगारवाढीचा फायदा तब्बल ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे होळीआधी कर्मचाऱ्यांना मिळालेली ही खूप मोठी खूशखबर आहे. २०२० असं वर्ष जेव्हा कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं, अशा परिस्थितीतही टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले होते. तेव्हा झालेली पगारवाढ आणि आता होणारी पगारवाढ लक्षात घेता, कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास १४ ते १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. 


केवळ पगारवाढच नाही तर TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांचं प्रमोशनही केलं होतं. आता पुन्हा होणारी पगारवाढ हेच संकेत देतेय, की कोरोना काळातही TCS स्वत:चं अर्थचक्र रूळावर आणतेय. 


TCS हीही टाटा ग्रूपची कंपनी आहे, ज्याचं मुख्यालय देशाची राजधानी मुंबईत आहे.