मुंबई : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने तरुण व्यावसायिकांसाठी “TCS iON Career Edge’ - एक विनामूल्य ऑनलाइन अभ्यासक्रम जाहीर केला आहे. TCS NSE -1.23 % नुसार, हा 15 दिवसांचा कोर्स नोकरी शोधणाऱ्यांना संवाद (communication) , सहकार्य (collaboration) , व्यवसाय शिष्टाचार (business etiquett), आर्थिक आणि डिजिटल साक्षरता (financial and digital literacy) यासारख्या त्यांच्या मुख्य रोजगारक्षमतेच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल, ज्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना याचा फायदाच होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कोर्सची पात्रता, कालावधी, कोर्स अभ्यासक्रम आणि हा कोर्स कोणी करावा याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.


कोर्स कालावधी:15 दिवस


तुम्हाला दर आठवड्याला किमान 7-10 तासांचा वेळ देऊन ते पूर्ण करावे लागेल.


कोर्स फॉरमॅट:


ऑनलाइन (Online Self-paced)


पात्रता:


हा कोर्स करण्यासाठी पदवीधर आणि पदव्युत्तर आणि फ्रेशर्स अर्ज करू शकतात.


या कोर्समध्ये वागणूक आणि संभाषण कौशल्ये आणि इतर स्किल्स, आयटी आणि AI या मूलभूत कौशल्यांसह 14 मॉड्यूल समाविष्ट आहेत, जे शिकवले जाताता.


एक विद्यार्थी 1-2 तासांच्या कालावधीत प्रत्येक मॉड्यूल पूर्ण करू शकतो. प्रत्येक मॉड्यूलमध्ये व्हिडीओ, प्रेजेंटेशन, वाचन सामग्री, टीसीएस तज्ञांनी रेकॉर्ड केलेले वेबिनार आणि मॉड्यूलचे सेल्फ असेसमेंट केले जाते.


या कोर्सचा एक अंतिम अभ्यासक्रम आहे, जे विद्यार्थ्यांची लर्निंग आणि कन्सेप्टवर काम करते. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर, शिकणाऱ्याला वैयक्तिक प्रमाणपत्र मिळेल. याव्यतिरिक्त, शिकणाऱ्यांना मॉडरेटेड डिजिटल चर्चा कक्षात प्रवेश असतो ज्यामुळे त्यांना पडलेले प्रश्न आणि सजेशन यांना सगळ्यांसमोर ठेवण्याची संधी मिळते.


कोर्स करण्यासाठी कधीही, कुठेही आणि कोणत्याही डिव्हाइसवर प्रवेश केला जाऊ शकतो.


या कोर्सचे 14-मॉड्यूल आहेत, जे आपण 2 आठवड्यांत म्हणजेच 15 दिवसात शिकाल


1. Communicate to Impress : आपले शाब्दिक आणि गैर-शाब्दिक संभाषण कौशल्य वाढवणे.
2. Deliver Presentations with Impact : आकर्षक आणि प्रभावी प्रेजेनटेशन कसे तयार करावे आणि द्यावे हे शिका.
3. Develop Soft Skills for the Workplace: चांगले परिणाम साध्य करण्यासाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व जाणून घ्या.
4. Gain Guidance from Career Gurus : TCSच्या बिझनेस एक्पर्ट्स करुन काही असा स्ट्राटजी जाणून घ्या.
 5. Write a Winning Resume and Cover Letter: चांगला रेझ्युमे आणि कव्हर लेटर कसे तयार करावे ते समजून घ्या.
6. Stay Ahead in Group Discussions: ग्रुप चर्चा का आयोजित केली जाते हे जाणून घ्या आणि सक्रियपणे सहभागी होण्यास शिका.
7. Ace Corporate Interviews: कॉर्पोरेट मुलाखतींमध्ये कसे उपस्थित राहावे आणि एट्रॅक्टीव्ह पर्सनॅलिसी कसे व्हावे हे समजून घ्या.
8. Learn Corporate Etiquette: कॉर्पोरेट सेटिंगमध्ये अनुसरण केलेले सामान्य व्यवसाय शिष्टाचार जाणून घ्या.
9. Write Effective Emails: प्रभावी कंटेन्टसह एक व्यावसायिक ईमेल तयार करणे.
10. Learn Corporate Telephone Etiquett: कामाशी संबंधित टेलिकॉल दरम्यान पाळले जाणारे शिष्टाचार समजून घ्या.
11. Understand Accounting Fundamental: आर्थिक स्टेटमेंटच्या आधारे अकाउंट्स प्रिंसिपल्स आणि कन्सेप्टस समजून घ्या.
12. Gain Foundational Skills in IT: TCS तंत्रज्ञांचे म्हणणे ऐकून आपले मूलभूत IT कौशल्य विकसित करा.
13.Understand Artificial Intelligence (AI) - Part 1: AI चा इतिहास आणि व्याख्या आणि AI चे वेगवेगळे दृष्टिकोन समजून घ्या.
14. Understand Artificial Intelligence (AI) - Part 2: AI चे कन्सेप्ट,  बाऊंडरीज आणि इतर गोष्टी जाणून घ्या.