Viral News : देशभरात गेल्या काही वर्षात चहाचा व्यवसाय (Tea Business) खुपच वाढला आहे. या व्यवसाय वाढीचे कारण म्हणजे, अनेकांनी स्वत:चे वेगवेगळे ब्रँड तयार केले आहेत. त्यामुळे खुप स्पर्धा देखील वाढली आहे. त्यात आता एका चहावाल्याची अनोखी स्टोरी (Trending Story) समोर येत आहे. या स्टोरीची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.


चहाच्या दुकानाचे युनिक नाव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षात आपण चहावाल्यांसंबंधित अनेक कहाण्या ऐकल्या आहेत.कुणी एमबीए चायवाला (MBA Chaiwala) आहे, कुणी पदवीधर चायवाला (Graduate Chaiwala) आहे, तर कुणी बेवफा चायवाला (Bewafa Chaiwala) आहे. अशा अनेक चायवाल्यांनी युनिक नावे देऊन टपऱ्या उघडल्या आहेत. त्याता आता आणखीण एक नाव जोडतेय, ते म्हणजे फ्रस्ट्रेटेड ड्रॉपआउट (Frustrate Chaiwala). 


हे ही वाचा : पोरान करून दाखवलं! आई-बाबांच्या कष्टाचं झालं चीज, IAS बनण्याची Success Story 


हे नाव ऐकून तुम्हाला कळालच असेल की, हा तरूण अनेकदा ड्रॉपआउट राहिला आहे. त्यामुळे या सततच्या ड्रॉपआउटला कंटाळून त्याने आता फ्रस्ट्रेटेड ड्रॉपआउट (Frustrate Chaiwala) नावाची चहाची टपरी उघडली आहे.  


पेमेंटची हटके सर्विस 


या चायवाल्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, हा चायवाला ग्राहकांना चाय देऊन त्याचे पेमेंट क्रिप्टो करन्सीमध्ये (Cryptocurrency) स्विकारतोय. आतापर्यंत देशात असे कोणतेच दुकान उघडेले नाही आहे, जे क्रिप्टोमध्ये पेमेंट स्विकारते. त्यामुळे त्याच्या या दुकानातली सर्विस पाहण्यासाठी ग्राहक गर्दी करतायत.


कोण आहे हा चायवाला?


हा चायवाला बंगळूरचा आहे. त्याचे नाव शुभम सैनी (Shubham Saini) आहे. तो एका कॉलेजमध्ये शिकत होता. मात्र शिकताना तो अनेकदा ड्रॉपआऊट राहीला. त्यामुळे वैतागून त्याने ही चहाची टपरी सुरु केली आहे.या टपरीला त्याने आपल्याच अपयशाच नाव देण्याचे ठरवले आणि फ्रस्ट्रेटेड ड्रॉपआउट (Frustrate Chaiwala) नावाची चहाची टपरी उघडली.  



दरम्यान आरपीजी ग्रुपचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी या चहावाल्याचा फोटो ट्विटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी हा नवीन भारत असल्याचे म्हटले आहे. हा चहावाला त्याच्या युनिक नाव (Frustrate Chaiwala) आणि पेमेंटच्या सर्विसमुळे खुप चर्चेत आला आहे. त्याच्या या चहाच्या टपरीची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.