Success Story : तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि दिवस-रात्र मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज गाठू शकता. हे मी नाही तर काही यशस्वी व्यक्तीचं सांगत आहेत. अशा संघर्षाने भरलेली स्टोरी तुमच्यासमोर आणत आहोत. या स्टोरीत एक 23 वर्षाचा तरूण IAS अधिकारी बनला आहे. अवघ्या 23 व्या वर्षी त्याने मिळवलेले हे यश खुप मोठे आहे. मात्र त्याच्या यशामागे खुप मोठा संघर्ष (Success Story) देखील आहे. हा संघर्ष काय होता, तो जाणून घेऊयात.
पेट्रोल पंपावर दिवसरात्र मेहनत करून कमावलेल्या पैशातून वडिलांनी प्रदीप सिंहला मोठं केलं. त्याच शालेय शिक्षण याच पैशातून झाले. प्रदीप सिंह हे खुप हूशार विद्यार्थी होते. त्यांना मोठे होऊन आयएएस (IAS) बनायचे होते. यासाठी वडिलांना आणखीण खुप मेहनत करावी लागणार होती. आणि त्यांनी ती केली देखील.
हे ही वाचा : हायटेक चायवाला! क्रिप्टोकरन्सीमधून घेतो पेमेंट, सोशल मीडियावर एकच चर्चा
बिहारच्या (BIHAR) गोपालगंज जिल्ह्यातील एका गरीब कुटूंबात प्रदीपचा जन्म झाला होता. यानंतर वडिल त्यांच्या कुटूंबियांना घेऊन इंदूरला आले होते. या इंदूरमध्येच प्रदीपच शालेय शिक्षण पुर्ण झाले होते. इंदूरमध्ये त्याने IIPS DAVV कॉलेजमधून बी कॉम (ऑनर्स पदवी) प्राप्त केली.
प्रदीपला आय़एएस अधिकारी (IAS officer) व्हायचं होते. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. वडील पेट्रोल पंपावर काम करायचे आणि आई गृहीणी होती. इंदूरमध्ये शिकण्यासाठी चांगली संसाधने नव्हती म्हणून त्याला आयएएससाठी दिल्लीला कोचिंगसाठी पाठवायचे होते. मात्र आर्थिकरित्या ते परवडणारे नव्हते. यासाठी मग त्यांनी राहते घर विकण्याचा निर्णय़ घेतला. घर विकून देखील पैसे कमीच पडत होते, मग त्यांनी गावातील वडिलोपार्जित जमीन विकण्याचा निर्णय़ घेतला.
प्रदीप यांनी 2018 साली युपीएससीची (UPSC Exam) परीक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात ते परीक्षा पास झाले. आणि त्यानंतर या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार IRS अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. पण प्रदीप यांचे ध्येय आयएएस अधिकारी (IAS officer) बनण्याचे होते. म्हणून प्रदीप पुन्हा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Exam) परीक्षा 2019 ला बसले. या परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया रँकींगमध्ये 26 वा क्रमांक पटकावला आणि ते आयएएस अधिकारी बनले. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी य़ुपीएससी क्रॅक केली.
दरम्यान प्रदीप यांच्या आयएएस (IAS officer) बनल्यानंतर कुटूंबियांमध्ये एकच उत्साह होता. पोराने कुटूंबियांच्या कष्टाचे चीज करत हे य़श मिळवले होते. प्रदीप यांची ही स्टोरी अनेक तरूण-तरूणींसाठी प्रेरणादायी आहे.