Viral Video of PPU copy check: सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. आयुष्यात काय घडतंय ते आधी सोशल मीडियावर टाकलं जातं. मग लाईक्स, कमेंट्सचा खेळ सुरु होतो. आजच्या काळात बहुतेकजण हेच करत असतात. याच कधी व्यसनात रुपांतर होतं हेच लोककांना कळत नाही. स्वत:चं वेगळेपण दाखवणारं रील तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचं. मग आपण सोशल मीडियावर प्रसिद्ध होतो. लाइक्स आणि जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतात, हे आता लहान मुलांनादेखील माहिती झालंय. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांनाही याचा मोह आवरता येत नाही. याचीच प्रचिती एका घटनेतून आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पेपर तपासनीस महिला उत्तरपत्रिका तपासताना रिल्स बनवते आणि ते रिल्स आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करते. 
काही मोजक्या व्ह्यू आणि लाईक्ससाठी हा स्टंट ही महिला करतेय. पीपीयू परीक्षेची उत्तरपत्रिका तपासतानाचे हे रिल्स असल्याची माहिती समोर येत आहे. 


व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला शिक्षिका शाळेच्या बाकावर बसलेली दिसतेय. तिच्यासमोर अनेक उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्या आहेत. महिला उत्तरपत्रिका उघडतेय आणि तपासतेय. पण तिचे लक्ष उत्तरपत्रिकेकडे नाहीय तर समोर असलेल्या मोबाईलच्या कॅमेराकडे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. PPU परीक्षेची कॉपी तपासण्याची रील इंस्टाग्रामवर व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे. विद्यार्थी खूप मेहनत करुन 3 तासाच्या परीक्षेत उत्तरे लिहितात आणि असे शिक्षक 30 सेकंदाच्या रिल्ससाठी उत्तरपत्रिकांकडे दुर्लक्ष करतात, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. 


काय आहे व्हिडीओत?



हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @BiharTeacherCan नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, मॅडमजी देखील चमत्कार करतात. हे अपलोड करणे आवश्यक होते का? तर दुसऱ्या यूजरने लिहिले, त्या पेपर तपासत आहेत. उत्तरे देखील वाचत नाही. 


अशा लोकांना सर्वात आधी नोकरीतून बाहेर काढले पाहिजे, अशा कमेंट्स येतायत. तर  दुसऱ्या यूजरने लिहिले, मॅडम पहिल्यांदाच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी गेल्या असतील आणि या उत्साहात रील बनवल्या असतील, त्यांनी असे करू नये, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.